सुख !

Started by श्री. प्रकाश साळवी, February 23, 2016, 04:50:09 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

सुख ।
सुख म्हणजे काय असतं
तोकडे अंथरूण अन् पसरलेले पाय असते
कोणाला बंगला म्हणजे
सुख वाटते तर कोणाला
"मंगला " म्हणजे सुख वाटते
कोणाला पैसा म्हणजे सुख वाटते
तर कोणाला गाडी (आॅडी) म्हणजे सुख वाटते
खरेच आजपर्यंत कोण सुखी झाला आहे काय?
तरीही आपण सारखे धावत
असतो सुखाच्याच मागे
का?
बंगला मिळाला, गाडी मिळाली
पण सुख मिळाले का?
आपली वणवण थांबली का?
नाही! कारण सुख म्हणजे
काय आहे? सुख म्हणजे
"गोगल गाय आणि पोटातले पाय" आहे
खरे सुख म्हणजे!!!
जे आहे त्यातच "समाधान" आहे
आम्हाला कळते पण वळत नाही
सुख म्हणजे वाढती भुक असते
आणखी काही नाही

श्री प्रकाश साळवी