सखी

Started by beyond_infinity, February 23, 2016, 10:06:38 PM

Previous topic - Next topic

beyond_infinity

सखी गोजिरी गोजिरी चंद्राहुन साजिरी
ऐन अवसेच्या राती जशी पुनव ही दारी

जशी पुनव ही दारी उभी राहे तो-यात
सखी आली अंगणात चांद लपला ढगात

चांद लपला ढगात चांदण्यांचा लखलखाट
सखी बसुन उंब-यात पाहे साजणाची वाट

पाहे साजणाची वाट आस मिठीत घेण्याची
सखी वेडावुन जाई वारा खेळे पदराशी

वारा खेळे पदराशी अंग मोहरुन जाई
सखी बावरी होताना चांद हळुच पाही

चांद हळुच पाही वेड्या सखीची घालमेल
साजण येता अंगणात सखी मिठीत शिरेल..
साजण येता अंगणात सखी मिठीत शिरेल......

अनंता पल्याड | ३१ जानेवारी २०१६

BHALGAT AKSHAY

va .. chan ... avadali kavita !!! :)