"प्रेम" नावाचा रोग झालाय तुला .."

Started by mohanish khunte, February 24, 2016, 04:29:29 PM

Previous topic - Next topic

mohanish khunte

आज मीच म्हटल तिला, जा बाई दूर जा माझ्यापासून,
परत भेटायचं पण नाही आपण ,
हळू हळू भेटण ,मग गप्पा बोलण नि हे करता करता
"प्रेम " नावाच व्यसन लागलय तुला........
              ती शांत होऊन म्हणाली , लागू दे रे व्यसन आता काय ,
               सगळच मी तुझ्यातच तर पाहते ,तुझ्यापासून लांब राहून
              काय मिळणार आहे का मला ..?
              मी म्हटल वेडी आहेस तू खरचं ,
              "प्रेम " नावाच व्यसन लागलय तुला.......
                     
जेव्हा भेटलो होतो पहिल्यांदा तेव्हा ती भांडली होती,
चुकून माझ्या पायाची लाथ तिला लागली होती..
नंतर खर तर मीच सॉरी म्हणत चॉकलेट दिल होत तिला ..
घमेंडी पण हुशार अशी काहीतरी वेगळीच दिसली होती ती मला ..
पण आता  "प्रेम " नावाच व्यसन लागल होत  तिला.......
             
              स्वतःची कामे स्वतः करायची नि अभ्यासात सगळ्यात
              पुढे जाण्याची सवय होती तिला ..
              बुजऱ्या मुलींच्यात नसेल कधी पण धिंगाणा मस्ती आवडायची तिला
              पुढे अशीच माझ्यात कशी गुंतली गेली हेच कळाल नाही तीच तिला न माझे मला ..
              पण आता  "प्रेम " नावाच व्यसन लागल होत तिला.......

आयुष्याच्या खरया कसोटीमध्ये माझ्यासारखं माझ्यासोबत
गुंतली गेली होती ती ..मी अडकलोय , हरलोय तरी माझ्या सोबत होती ती ..
तिच्या भविष्याच्या विचाराने जाग केल मला ..
आता तिलाच माझ्यापसुन दूर करून जग कराव हे जाणवलं होत मला कारण ..
"प्रेम " नावाच व्यसन लागल होत तिला.......

            आज ठरवलं तोडायची सगळी नाती आणि विसरून जायचं तू मला
            खूप बोललो तिला, डोळ्यातून भावना पाण्यासारख्या
            वाहताना पाहिलं होत मी तिला ..
            मी तुझ्याशिवाय पण खुश राहू शकतो हे खोटच का होईना रागावून सांगितल होत     तिला
           आता करणार तरी काय ना ?
            "प्रेम " नावाच व्यसन लागल होत तिला.......

ती दूर जाऊन आता खूप काल उलटला गेला..
आता फोन नाही मेसेज नाही ,यशाचा तलाव तिचा सुखाने भरला गेला ..
कदाचित माझ्यात अडकण्याच्या शिक्षेतून शेवटी सुटका मिळाली होती तिला ..
एवढ्या वर्षांनी आज तिला पाहिलं यशस्वी होताना आणि आठवल ..
हि तीच होती.... कधीतर "प्रेम " नावाच व्यसन लागल होत जिला.......

http://mohanishkhunte25.blogspot.in/
         
          अचानक आज आरश्यासमोर उभा असताना समोरून आवाज आला ,
          "मूर्ख आहेस तू !.....अरे खुश राहावी म्हणून दूर केलस तू जिला ,बघ तू तुझ्याचकडे ..
           आता खरच "प्रेम" नावाचा रोग झालाय तुला ..
                                                      "प्रेम" नावाचा रोग झालाय तुला ..

                                                                   
- मोहनिश महंमद खुंटे.



Ravi Udawant