तीला कधीतरी त्याची आठवण येते

Started by निखिल जाधव, February 24, 2016, 06:00:11 PM

Previous topic - Next topic

निखिल जाधव


तिला कधी कधी त्याची आठवण येते,
पावलांना तिच्या, भूतकाळात नेते.
ती डोळे गच्च बंद करून घेते,
पण स्वप्नातही स्वप्न त्याचेच येते....

"कसा असशील तू?"
तिला थोडीशी काळजी वाटते ,
कधी कधी नकळत पण डोळ्यांत
तिच्या पाणी साठते.

तडजोड कितीही केली मनापासून मान्य
तिने...पण...कितीही केलं,
तरी भरून आलं कि आभाळ फाटते.
ती हसते, मग जग फसते...

तिच्या मनात काहीच नसूनही
खूप काही असते,
मनातली ठिणगी 'कधी' पाण्याने विझते?
आतून जागी अन ती डोळ्यांनी निजते...
♥♥♥

https://mobile.facebook.com/nikhiljadhav0143?_e_pi_=7%2CPAGE_ID10%2C7332728230

- निखिल जाधव