शल्य जगण्याचे

Started by शिवाजी सांगळे, February 24, 2016, 09:42:09 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

शल्य जगण्याचे

सोडून तुटली नाती, व्रण जखमांचे
हाती उरले आता, शल्य जगण्याचे !

फुलवुन पिसारा, जन्म सौख्याचा
दाविलेस मज तू, का स्वप्न रंगाचे?

उरतील तूजकडे, अंश कण कण
दिल्या घेतल्या, त्या गंध क्षणांचे !

ठेव करूनी बंद, तो नक्षी झरोका
अस्तित्व शोषलेला, मज चाहूलीचे !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९