रोज कशी रस्ता चुकून...

Started by AKshay Pujari (#AKuvach), February 25, 2016, 03:31:16 PM

Previous topic - Next topic

AKshay Pujari (#AKuvach)

रोज कशी रस्ता चुकून,
नेमकी मला भेटतेस?
की आपली भेट व्हावी म्हणून,
मुद्दाम दबा धरून बसतेस?

मला वेळ झाला एखाद-दिवस
तरी तिथेच दिसतेस..
इतका अचूक योगायोग,
कसा बरा साधतेस?

मुद्दाम येतेस माहितीय मला,
हे ही तू जाणतेस..
तरी रोजची भेट आपली,
योगायोग भासवतेस..

कधी येण्या उशीर करुन,
शंकांचं काहूर माजवतेस..
जणू काही माझ्या मना,
काळजी बनून भेडसावतेस..

रोज नवी सर बनून,
या चातकाला तू सुखावतेस..
भेटतेस काही क्षणांपुरती,
पण आठवणींची सारी जागा बळकावतेस..

-   AKshay Pujari (#AKuvach)