फुलोरा.

Started by शिवाजी सांगळे, February 25, 2016, 10:45:08 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

फुलोरा...

कधीतरी फिरायला
जायचो आपण,
मनातुन खुप खुश
असायचीस तेंव्हा तु...

तळहातावर अलगद
ठेउन हात कित्तेकदा
म्हणायचीस...
केवढा रे तळवा हा?

सामावुन जाईल
माझा हात
मुठीत तूझ्या,
मिठीत, सामावते जशी...

झ-याचं पाणी
शिंपडल्यागत,
किती बोलायचीस?
चिंब व्हायचो,
शब्दांच्या सरींनी...

धुंद व्हायची...हवा
जेंव्हा गज-यातुन
ओघळलेलं फुल
यायचं अलगद,
खांदयावर... माझ्या...

मोग-याला पण
कसं सुचायचं?
तेव्हांच फुलायला?
बेधुंद दरवळायला?

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

sumali kshirsagar

  ओठांवर आलेले शब्द

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तुला कळतच नाही
मग उगाच अबोला धरते मी..पन ते ही खोट खोट रूसते मी...तुला कलतच नाही...भेटत नसलो तरी प्रत्तेक ठिकानी तुला आठ्वते मी...ओठा वर आलेला भाव हळुच अश्रूत साठवते मी....तुला कलतच नाही... भेट ही घडते..आनी क्षनातच संपते..
वेळे आभावी साथ तु माझी सोडतोस... पण थाबंलास कि अगदी टक लावुन पाहतोस....कधी कधी वाटत तुझ्या मीठीत घेवून मला समजावशील...खरच नक्की मनात काय आहे ते सागशील.....डोळ्यानी सागुन ही जातोस...डोळ्यानी सांगुन ही जातोस.........अन माझ्या मनात प्रेमाची आषा जागवतोस... .अंन निरोप घेताना मात्र गेल पाहिजे अस स्व्तालाच सांगतोस...
Dedicated to my fev...miss you lot..

sumali kshirsagar  (Satara)

sumali kshirsagar

समजुत...
मनाची समजुत घालुन थकले रे...नात्याची गरज फक्त मलाच आहे का अस स्वताला विचारुन थकले रे....
उमगतील का कधी तुला या तु न जानलेल्या भावना...
तुज़्या साठी फक्त हा सारा खेल च झाला...नशिबी मात्र माझ्या एकटे पनाच आला...
कधी न खेललेला खेल तु माझ्या शी खेललास...अन आता मात्र साथ सोडुन चाल्लास...
स्वताची वाट जशी शोधलीस तशी माझी ही वाट मला शोधुन दे....शेवट पर्यन्त नाही पन वाट मीले पर्यन्त तरी थोडीशी तरी साथ दे....
खुप सारे प्रश्न मला पडले....पन याच गणित कधीच नाही उलगडले....


Sumali Kshirsagar  ( SATARA)

sumali kshirsagar

Nakalat ghadhlel prem..

Diwaytli wat jewha dusray sathi jalate tasch maz hi man tuzay sathi jalat hot..nakalat Tuzi aas man tuz mazaych manat jagwat hot.
kadhi kalaly nahit ka re tula ya bhawana..disalay nahit ka kadhi tula tay yatana..
shwas hotas tu...ek vedi nasha hotas tu..
gammt mhanun khel khellas...an tithech tu mazay manat ghav kelas....
prem kadhi navtech te...are prem kadhi navtech te khel hota manacha...fakt dikhawa hota aaplepanacha...
n kalat ghadlela lapandav sara...ardhwatach rahila...
are ardhwatach rahilay ichay aakanksha...
tula samjlaych nahit kadhi mazay aapeksha...
swrtha sathi cha khel kevhach sampla... An
n kalat ghadlelay ya mazay manane tevhach shewtacha shwas sodala...,
miss you lot Motu...

Sumali Kshirsagar Satara

शिवाजी सांगळे

फारच भावनात्मक लिहीताय आपण, खुप आनंद वाटला कारण कवितेला कवितेतून उत्तर मिळाले, वैयक्तिक नाही परंतु भावना जाणल्यात. खुप छान लिहीलयं, असंच लिहीत रहा व काव्यानंद वाटत रहा. आपणांस होळी व रंग पंचमीच्या खुप शुभेच्छा.
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९