घडी-घडीने बिघडला डाव..

Started by AKshay Pujari (#AKuvach), February 26, 2016, 04:20:06 PM

Previous topic - Next topic

AKshay Pujari (#AKuvach)

सारे घडीत घडले राव,
घडी-घडीने बिघडला डाव..

नेटके आहे सारे
सांगे चेहऱ्यावरचा भाव,
तरी आतून मजला ठावे
नेटकेपणाचा नुसताच आव
घडी-घडीने बिघडला डाव...१

वरून भासे संथ जरी,
प्रत्येक घडी भरधाव,
अशाच एका भरधाव क्षणी
केला 'त्या घडी'ने शिरकाव
घडी-घडीने बिघडला डाव...२

एका घडीत पडला
'त्या विपरीत घडी'चा प्रभाव,
अपशकुनीच ती घडी खरी
जरी रचला तिने मुहूर्तापरी बनाव
घडी-घडीने बिघडला डाव..३

सारे घडीत घडले राव,
घडी-घडीने बिघडला डाव..

- AKshay Pujari (#AKuvach)