विशाखा फ़क़्त तुझ्यासाठी

Started by kalpesh.patil, February 26, 2016, 11:24:02 PM

Previous topic - Next topic

kalpesh.patil

😊   समजून घे  😊

आठवणींचा धागा तुटेल कसा
प्रेमाच्या गाठी बांधल्यावर
मी तुला वीसरेन कसा
तू आणि मी मीच असल्यावर 

बेभान अश्रूंचा पूर येतो
तू दूर गेल्यावर
जसा समुद्र खवलुन उठतो
लाटा अर्धवट परतल्यावर


भेटीच्या आकांताने  व्याकूळ होतो
दुःखी ,निराश ,हतबल होतो
जसा मावळतीच्या सूर्याचा
तेज कमी होतो


माझं हे जीवन माझं नाही
तुझ्यावीणा तर मीच नाही
जसं तहानलेल्या जीवाला
पाण्यावीणा पर्याय नाही


खुप काही सांगायचय तुला
परंतु शब्द कमी पडतील
याची खंत वाटत नाही
कारण तु समजून घेशील
   
                 कल्पेश पाटील