विशाखा फ़क़्त तुझी आठवण

Started by kalpesh.patil, February 27, 2016, 07:47:47 AM

Previous topic - Next topic

kalpesh.patil

👫 तुझी आठवण 👫

तुझी आठवण म्हणजे
पावसाची सर
हळुच गारवा जाणवणारी
जणु वाऱ्याची झुळूक
क्षणात नभात घेऊन जाणारी

तुझी आठवण म्हणजे
अंधारातला काजवा
पण त्याचा उजेड देखील
सूर्यापेक्षा प्रखर वाटावा

तुझी आठवण म्हणजे
गहीवरलेला श्वास
मायेने भरवलेला
प्रेमाचा घास
आयुष्यभर हवाहवासा वाटणारा
तुझा सहवास

तुझी आठवण म्हणजे
सुखद वेदना
कधी न संपणारी
हवीहवीशी वाटणारी
ह्रुदयात उमळणारी
एक प्रेमळ भावना

         कल्पेश पाटील...