विश्वास

Started by vaibhav vinod patil, February 28, 2016, 12:14:42 AM

Previous topic - Next topic

vaibhav vinod patil

नाही तूला विश्वास
मी करू तरी  काय
असच जर चालले तर
होइल प्रेमाचा अंत

वैभव

तेजस वेताळ

प्रेमचं फुल माझं
डस्टबिन मध्ये होते,
ते पाहून मन
मनीच रुसलं होते...

तिच्यासाठी 10 ₹ फुल
माझ्यासाठी लाखमोलाच होत,
गुलाबाच्या पाकळीत माझं
मन लपवलेलं होत...

गुढग्यावर बसून तिच्यासमोर
धरलेल फुल तिने नाकारलं होत,                               
नकळता मला, प्रेम माझं                                             
तेव्हाच हरलं होत...

डस्टबिन मधल्या त्या
गुलाबाच्या पाकळ्या मला,
मोडलेल्या हृदयाची जाणीव
करून देत होत्या...

विखुरलेल्या मनात सोबत
गुलाबाच्या पाकळ्या मला,
रोज रागाने
बघत होत्या...

गुलाबाच्या त्या काडीने
फार मोठा कर्तव्य बजावलं होत,
त्या झाडाच्या कित्तेक फुलांनी
कित्तेक मनांना जोडलं होत...

डस्टबिन मधलं फुल आता
वृंदावनात होत,,
शेवटी प्रेम माझं हरलेल नव्हतं
शेवटी प्रेम माझं हरलेल नव्हतं...