थेंब थेंब पाणी

Started by शिवाजी सांगळे, February 28, 2016, 12:25:02 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

थेंब थेंब पाणी

थेंब थेंब वाचवा पाणी
जगण्याची लिहा कहाणी,
पशु पक्षी मुक वनचरे
शोधतात जल रानोवणी !

सहवेल तृष्णा तूम्हाआम्हा
काही काळ नसता पाणी,
जीवन नाम, दुसरे आप
म्हणुनी सर्वाते जगवी पाणी !

थांबवुनी अपव्यय, वाचवू
शक्यतो हातून जेवढे पाणी,
करून स्वतः सार्थ योजना
समजु जलबचत आणीबाणी !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

जयंत एस कुलकर्णी



पाणी  बचतीचा  संदेश  जावा  असाच  सकलत्र
येणारे  सुखावेल आपलेच  सारे  वंश पुत्र  प्रपोत्र 

नुसतेच  पैसा  आणि  घर  जागा  गाडी 
कुठे  चाललात ओसाड  करून  शेतीवाडी

पैसा  खायचा  का  दोन  वेळचे अन्न
यातच मन  होईल बघा  बहुतचि सुन्न 

भयान  जगतोय आजचा हा  माणूस
अन्  पाण्याची  करतोय  निव्वळ नासधूस

साखर  नाही  स्वस्त  कारण  कुठेय  ऊस
का  येत  नाही  ढगातला नेहमीचा पाऊस

पाण्याची  बचत करूया  जीवनास  बहारुया 
संकल्प  प्रत्येकाच्या हाच करी आता देऊया 

जयंत एस कुलकर्णी  (पामर झरणी)



शिवाजी सांगळे

जयंतराव,  धन्यवाद, खुप वास्तव गोष्ट आपण नमूद केलीत, सर्वानी प्राप्त स्थितीचे आकलन करून घ्यायला हवे।
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मिलिंद कुंभारे


शिवाजी सांगळे

मिलिंदजी खुप धन्यवाद...
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९