काहीतरी सुचतंय मनाला बोचतंय … !!!!

Started by samudra, February 28, 2016, 04:31:40 PM

Previous topic - Next topic

samudra

काहीतरी सुचतंय मनाला बोचतंय ... !!!!

आयुष्य म्हणजे फक्त जगणे ,
रोजच उठणे नुसतेच धावणे ...
कृत्रिम जगाच्या गर्दीमधे ,
आपले अस्तित्व टिकवणे ....

पैशानेच जग जिंकता येते ,
हेच आजची पिढी शिकवते ...
मनाचे समाधान देखील ,
दुसऱ्याच्या अपयशात शोधते ...

शाळेत स्पर्धा कॉलेजात प्रेम ,
व्यवसाय असो वा नोकरी ...
सगळीकडे फक्त पैशाचाच गेम .
सर्वत्र असे हे विदुर चित्र ,
मिन्त्रासोबातच शोधतो मित्र ...

शिकून सर्व बुके माणूस राहतो अडाणी ,
माणसालाच दुखावून गातो माणुसकीची कहाणी ...
आई बापाला विसरून स्वार्थ साधते पोर ,
सर्व सुखे भोगूनही ये दिल मांगे मोर...???????