शेतकरी-विशाल हरेल..

Started by vishal harel, February 29, 2016, 12:11:53 PM

Previous topic - Next topic

vishal harel

एका शेतकरयाच्या मुलाची व्यथा..
.
थांब थांब बाबा सोडुन जाऊ नको लांब..
तुझ्याविना आम्हाला कोण आहे तरी सांग..
.
थकला असशील थोड़ा कर तु आराम..
थांब थांब बाबा सोडुन जाऊ नको लांब..
.
ताई माझी आहे तिला हवा आहे वर..
कन्यादान तिच तुझ्या हाताने तु कर..
.
नको मला सायकल अन नको मला शाळा...
पैका पाई सावकारा कड फैलु नको झोळा...
.
आई माझी सतत माझ्या लागतीया पाठी..
धनी माझ घरला येईल की नाही तिला वाटतेया भिती..
.
धीर धर थोडा पुढ लागल पिकांची रांग..
थांब थांब बाबा सोडुन जाऊ नको लांब..
.
हातभार लावीन तुला करील थोड काम...
थांब थांब बाबा सोडुन जाऊ नको लांब..
.
लेखक-विशाल हरेल..