संवेदनांची ऐशीतैशी … !!!!!

Started by samudra, February 29, 2016, 01:06:32 PM

Previous topic - Next topic

samudra

डोळे असून उघडे आंधळा झालाय समाज ,
तडफडताना बघून दुसऱ्यास येते सेल्फीची खाज...

मोबाईल झाला मित्र फेसबुक हेच आयुष्य ,
आई बापाला भेटत व्हाटसअपर उद्याच भविष्य ...

इंटरनेटच्या जगात मनुष्य झालाय  कृत्रिम,
म्हणूनच का उद्या रोबोटच असतील त्याचे मित्र-मैत्रीण...

बापाच झालं "ATM" आणि आई  झाली "kitty" बिझी,
संस्कृतीचा झाला ऱ्हास म्हणे life is not easy...

संवेदना काय असतात विचारला यांना मी प्रश्न,
तर म्हणाले,गुगल करत जा असले फालतू प्रश्न...

भावानांशिवाय आता खरच का जगता येईल.?,
संवेदनांना माझ्या आता गुगलच का उत्तर देईल . ????