पहिला यशस्वी प्रपोज

Started by kalpesh.patil, February 29, 2016, 08:40:56 PM

Previous topic - Next topic

kalpesh.patil

👫 पहिला यशस्वी प्रपोज 👫

तुला पाहताक्षणी
विचारांचा डोंगर उभा राहिला
हीच का ती आपुली
हा प्रेमळ विचार सूर्यासारखा उगवला

नको नको ते प्रेम
असं बजावलं स्वतःला
पण स्वतःशीच भांडलो
कसं समजाऊ या वेड्या मनाला
        हीच का ती आपली....

नको ती आशा
नको ते बंधन
कशाला अडकऊ स्वतःला
म्हणून स्वतःच केलं सांत्वन
डोळे बंद करुन विचारलं मनाला
तेव्हा हो,
         हीच का ती आपली....

मग तीला शोधु लागलो
तीला आवडेल असं वागू लागलो
ती आयुष्यात यावी
म्हणून प्रार्थना करू लागलो
     एकेदिवशी तिनेच विचारल मला
     काय आहे तुझ्या मनात
     माझ्याशिवाय दुसरी
     नाही ना तुझ्या ह्रूदयात
मी मात्र स्तब्ध झालो
काय बोलू म्हणून
विचार करू लागलो
तेव्हा मात्र मी ही
माझ्या प्रेमाची ग्वाही दिली
डोळ्यातल्या अश्रूंनी
तिला मिठी ही मारली
तेव्हा मात्र हो
        हीच का ती आपली....vishu love u 🌹

           कल्पेश पाटील ( पनवेल )
            9594764745
            kalpesh.101074@gmail.com