रात्र ....!!!!!

Started by omi2208, March 01, 2016, 02:55:17 AM

Previous topic - Next topic

omi2208

चांदण्यांची चाहूल लागते जेव्हा संध्याकाळ पांघरून रात्रीचे घेते,
चंद्रही येतो सोबतीला जेव्हा मन आभाळात भरारी घेते ...!!!
स्वप्नाच्या आभाळी मन स्वच्छंदी फिरेते,
फिरून दमले आता ते ढगावर लोळू पाहते ....!!!!
कितीही शांत असले जरी मन तरी ते  थोडेसे खोडकर होऊ पाहते,
कारण रात्रीची मजाच असते वेगळी त्यात स्वप्नाची सोबत लाभते ...!!!
फिरून लोळून थकलेले मन पुन्हा खाली येऊ पाहते,
तोच दुरून पहाट  नवीन सुरवाती करिता उंबरठ्यात येऊन उभी राहते ....!!!!! - Omi2208 ;)