विरह

Started by गणेश म. तायडे, March 01, 2016, 07:46:43 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

मन का असे अधीर जाहले
गुंतूनी तुझ्यात राहले
आठवणींच्या छायेखाली
आयुष्य सारे विरून गेले
मखमली तुझ्या सहवासी
चित्त सारे हरवून गेले
नयनी साठवलेलीेे स्वप़्ने
विरहाने सारे वाहूनी नेले
संसार मांडलेला स्वप़्नी
अपुर्ण स्वप़्न बनून राहिले
शोधले पाहिले तुला सर्वत्र
पण तु हृदयात दडून राहिले
दुर का गेलीस इतकी?
विसरून आपले नाते
बोलव मला ही तुजपाशी
एकटा ना विरह सोसे...

- गणेश म. तायडे
   खामगांव
   ganesh.tayade1111@gmail.com