माऊली (सर्व भक्तांना श्री गजानन महाराज प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा)

Started by गणेश म. तायडे, March 01, 2016, 09:07:12 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

माऊली माऊली गजानन माऊली
असू द्या सदा तुमच्या भक्तांवर सावली
गण गण गणात बोते मंत्र गुंजला सर्वत्री
जिवन सहज होते पडता तुमची दृष्टी
तहान भुक हरली पाहता तुम्हा लोचणी
दीन भाबळ्या भक्तांचे तुम्हीच आहे कैवारी
विणा मृदुंग वाजे नाचे तव वारकरी
हरवूनीया सुख दुःखे सारी तत्पर सेवेकरी
दिंड्या पालख्यांची गर्दी जमली आज शेगांवी
प्रगट दिन आज आपला असु द्या कृपा दृष्टी...
- गणेश म. तायडे
   खामगांव
   ganesh.tayade1111@gmail.com