बाग त्याने फुलवला ......

Started by samudra, March 01, 2016, 11:54:59 AM

Previous topic - Next topic

samudra

सर्व शेतकरी बांधवांस समर्पित....

रक्ताचे करून पाणी बाग त्याने फुलवला ,
आज येतो उद्या करून पावसाने फक्त झुलवला ...

कष्ट आणि जिद्द अलंकार आहे त्याचे   ,
प्रामाणिक राहूनही चटके सोसतो नशिबाचे ...

आजारी असतो बाप कर्ज डोक्यावर अडमाप ,
सरकार देते हमी पण शहराकडेच झुकते माप ...

वेळ असेन तेंव्हा येउन बघा गावाकडे ,
गरीबीतही इथल्या मिळतील माणुसकीचे धडे ...

निसर्ग माझा मित्र विसरलेत सगळे ,
स्विमिंगपूलच्या डबक्यात उडतायेत प्लास्टिकचे बगळे ...

डान्सबारच्या दारूत होतोय पैशाचा धूर ,
गावाकडे आमच्या आत्म्हत्येलाच आलाय पूर ....

बळीराजा म्हणतो कष्ट करेन मी खूप ,
पोराला मात्र माझ्या शिकायची लई भूक ...

दोन वेळच अन्न निजायला निवारा ,
एवढीच त्याची इच्छा नकोय कुणाचा सहारा ... 

एक दिवस येईल जेंव्हा मिळेल नशिबाची साथ ,
सुखे सर्व दारात उभी राहतील जोडून दोन्ही हात ...


                                            by:- समुद्र ...।