नक्कल

Started by Mayur Dhobale, March 01, 2016, 03:16:48 PM

Previous topic - Next topic

Mayur Dhobale

नक्कल....

तो रोज त्याची नक्कल करतो
हुबेहूब नक्कल करतो

पहिल्या दिवशी ,
लोक प्रचंड टाळ्या पिटतात...
हे बघून तो फारच खुष होतो ...
मग अजून सराव करतो.

दुसऱ्या दिवशी ,
लोक तर वेडेच होतात.
काही तर शिट्ट्याही मारतात.
आता सगळं सोडून तो,
फक्त आणि फक्त सरावच करतो.

मग तिसऱ्या दिवशी ,
तो त्याची अशाप्रकारे नक्कल करतो की-
ह्याच्यात आणि त्याच्यात;
तिळमाञ फरक नाही .
गच्च भरलेल सभाग्रुह,
टाळ्या -शिट्ट्यांनी पार,
दणाणुन उठतं......
आता कार्यक्रम संपतो.
प्रत्येकजण बाहेर पडतांना,
त्याला शाबासकी देतच बाहेर पडतो...
तितक्यात एकजण ,
फाटके तुटके कपडे घातलेला;
त्याला म्हणतो -
" व्वा व्वाह, 'आज' काय नक्कल केली त्याची...
'उद्या' माझीही कराल का प्लीज ? "
हे ऐकून त्याचा चेहराच पडतो...
तो फार खिन्न होतो ;
पळत पळत आरशापाशी जातो,
आरशात स्वतः ला निरखुन पाहतो,
पण आरशात त्याला 'तो' सोडून ,
टाळ्या पिटणारं ते गच्च
सभाग्रुहच दिसतं...


        -   मयुर ढोबळे 
         https://www.facebook.com/Mazi-kavita-1505223896380307/