♥ बाप नावाचा देव ♥

Started by Manish H.Sase, March 01, 2016, 04:36:34 PM

Previous topic - Next topic

Manish H.Sase

बाप नावाचा देव

लहानपणी बापाने
हात धरुन शिकवलं
प्रत्येक हट्टाला त्यांनी
कष्ट करुन पुरवलं
बाप नावाच्या देवाला
आपण नाही ओळखलं

शिकुन मोठ व्हाव म्हणून
बालवाड़ी ते डीग्री
हवा तो पैसा पुरवला
स्वतः फाटकी चप्पल घालून
आपल्याला  शिकवलं
बाप नावाच्या देवाला
आपण नाही ओळखलं

भांडण आपलं झालं
तर बाबाच पुढे सरसावला
प्रत्येक चुकीला माफ करुन
संस्कारांचा काढा पाजला
अर्धपोटी राहून
आम्हाला मोठ्ठ केलं
बाप नावाच्या देवाला
आपण नाही ओळखलं

मुलीच्या सुखासाठी
तीच्या सासरच्यांना
कमी काही पडेल म्हणून
घर ही गहाण टाकलं
कर्जात बुडून ही त्यांनी
मुलीला सुख दिलं
बाप नावाच्या देवाला
आपण नाही ओळखलं

प्रत्येकाच्या स्वप्नांचा
होयबा होऊन राहीला
समाजातल्या संस्कृतीचा
निर्मिक तो जाहला
पोरांसाठी त्यानं
जीवाचं रान केलं
बाप नावाच्या देवाला
आपण नाही ओळखलं

संकट आल मोठं
तेव्हा "अरे बाप रे" !
हाच उद्गार काढला
मोठ मोठ्या संकटांना
मग बापच पुरे पडला
नवस न करताच
वरदान त्यानं दिलं
बाप नावाच्या देवाला
आपण नाही ओळखलं

आपल्या कुटुंबाचा
आधारस्तंभ झाला
जगाला तोंड देतांना
पेटता निखारा जाहला.
आपल्या कल्याणासाठी
वाटेल ते केलं
बाप नावाच्या देवाला
आपण नाही ओळखलं

       ( एक विद्यार्थी )
                       शब्द - --- - मनिष सासे

( ८५५४९०७१७६ )
( ९२०९२५००९२ )

मु. किन्हवली
ता. शहापुर
जि. ठाणे