तुझं प्रेम

Started by Dnyaneshwar Musale, March 01, 2016, 06:25:18 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

तुझं प्रेम मला
कधी कळलंच नाही
अन तुझं माझं नात
कधी झुळलंच नाही .

मी होता वेडा
हे घेतलंस तु समजुन
प्रेम नक्की काय असतं
ते नाही मला दिल उमजुन.

तुझ हसणं, बोलणं सर्वच
होतं प्रेमात पाडणारं
माझं वात्रट वागणं होतं
तुझ्या भावनांना तोडणारं.

तुझं नसुन पण असणं
तर कधी शेजारीच लपुन बसणं
हे मी नाही जाणलं
तुझ्या असण्याला  मी मात्र प्रेम नव्हतं मानलं.

निशब्द होऊन गाणी तु माझ्यासाठी गायली
खरं प्रेम तर तु करत राहिली
तुझ्या प्रेमाला मी दाद कधी नाही वाहिली
मी फक्त तुला दुरचं म्हणूनच पाहिली.

तुझ्या अखेरच्या भेटीत मी मात्र जेरबंद झालो
तुझं प्रेम समजलं हे सांगायचं राहूनच गेलो
तु गेलीस दुर बनुन झुळझुळणारी सरिता
शोधुन शोधुन मी बनवुन ठेवली तुझी माझी कविता.