मलाही वाटतं

Started by kalpesh.patil, March 01, 2016, 11:10:08 PM

Previous topic - Next topic

kalpesh.patil

👫 मलाही वाटतं 👫

मलाही वाटतं
कुणीतरी असावं
गालातल्या गालात हसणारं
भरलेच जर आसवांनी
तर डोळे पूसणारं

मलाही वाटतं
कुणीतरी असावं
आपलं म्हणणारं
जर केलंच परकं जगानं
तर आपलं करुन घेणारं

मलाही वाटतं
कुणीतरी असावं
सोबती हसणारं,रडणारं,भांडणारं
विनाकारण का होईना
उगीचच रागावणारं

मलाही वाटतं
कुणीतरी असावं
हातात हात घेणारं
दबक्या पावलांनी का होईना
सोबती चालणारं

मलाही वाटतं
कुणीतरी असावं
आपल्यावर प्रेम करणारं
साताजन्माचं हे जीवन
एका क्षणात जगवणारं
एका क्षणात जगवणारं

                 कल्पेश पाटील ( पनवेल )
                 9594764745
                 kalpesh.101074@gmail.com