कवितेच्या जाळ्यातून

Started by सागर बिसेन, March 02, 2016, 06:01:51 AM

Previous topic - Next topic

सागर बिसेन

📝कवितेच्या जाळ्यातून...📝

आवर, आवर, तुझ्या मनाला आवर।
कवितेच्या या जाळ्यातून, स्वतःला सावर।।

शब्दांचे हे बंधन, भावनांचे इथे गुरफटने,
मनातल्या विचारांना शब्दांत इथे उतरवणे।
आवर, आवर, तुझ्या मनाला आवर....
कवितेच्या या जाळ्यातून, स्वतःला सावर...।।

कोण ऐकतो रे इथे, कुणीच आपलं नाही,
फक्त सजवत जावे ओळींत, येईल मनात जे काही।
आवर, आवर, तुझ्या मनाला  आवर...
कवितेच्या या जाळ्यातून, स्वतःला सावर...।।

मनात आलेलं सर्व, आपण सहज इथे उतरवतो।
आपल्या भावनांचा खेळ करत, दुसरा हशा पिकवतो।
आवर, आवर, तुझ्या मनाला आवर...
कवितेच्या या जाळ्यातून, स्वतःला सावर...।।

कधी सुखावर लिहितोस, कधी दुःखावर लिहितोस,
कशाला विनाकारण स्वगत, या स्वार्थी जगाला बोलतोस।
आवर, आवर, तुझ्या मनाला आवर...
कवितेच्या या जाळ्यातून, स्वतःला सावर...।।

बघ रे बघ! आपोआपच कसे शब्द जुळून जातात,
नकळतच कितीतरी मग कविता घडून जातात...
नकळतच कितीतरी मग कविता घडून जातात।
आवर, आवर, तुझ्या मनाला आवर...
कवितेच्या या जाळ्यातून स्वतःला सावर...।।


©सागर बिसेन
०१/०३/२०१६
९४०३८२४५६६