कोरड्याच वाणीतून

Started by सागर बिसेन, March 02, 2016, 06:06:36 AM

Previous topic - Next topic

सागर बिसेन

📝"कोरड्याच वाणीतून"📝

किती मांडावे दगड काळजावर,
किती फेरावे आपल्याच आशांवर पाणी।
महागाईच्या या काळात जेवघेण्या,
रूपही आपले बदलून गेलीत नाणी।।

आजवर आम्ही जगत आलो,
आशा बाळगून नुसत्या सुपिकतेच्या मनी।
काळचक्रात या फसव्या आधुनिकतेच्या ,
आता सर्वच आले आमच्या ध्यानी।।

होते आमच्यावर 'वर' राजकारण,
विषय बातम्यांचा बनत जातो दरदिनी।।
सगळेच फक्त बोलू लागलेत,
समोर धजत नाही आमच्यासाठी कुणी।।

आम्हाला कुठे बोलायला मिळतं,
अबोलच असते सतत आमची वाणी।
धनिक अजून 'धनी' झाले,
पण वंचित नफ्यापासून शेतीचाच 'धनी'।।

सर्वच आता तसे उपजले,
दोष कुणाकुणाला द्यावे मग आम्ही।
पीक शेतातच गळून बसले,
तरीही करी 'भाव' आमच्याशी हरकुणी।।

व्यक्त करता करता दुःख इथे,
गारठली बघा प्रत्यक्ष आमचीच वाणी।
शुष्क पडलेल्या डोळ्यांतूनही वाहती,
अश्रू समद्या शेतकऱ्यांचे, होऊन पाणी।।


© सागर बिसेन
९४०३८२४५६६
०१/०३/२०१६