कवडीमोल

Started by शिवाजी सांगळे, March 02, 2016, 08:22:17 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

कवडीमोल

जाणन्या मी भाव माझा
केला प्रयास होता कधी,
जपले अमुल्य, म्हणुनी
नाही होणार भाव कधी !

जिरला होता अंगी माझ्या
कधी काळी एक धंदा,
गेलो विकाया मी स्वतःला
तिथेच झाला पुरता वांदा !

लावली बोली मी स्वतःची
न मांडता दुकानी बाजारी,
कवडीमोल भाव खरीदन्या
आले तेंव्हा मज व्यापारी !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९