अंतर्नाद

Started by Mayur Dhobale, March 03, 2016, 02:09:57 PM

Previous topic - Next topic

Mayur Dhobale

अंतर्नाद  (गझल)

केव्हातरी पहाटे ,
मी आत आत जातो ...
आत जात असता,
हलकेच गात राहतो...

गाणे इतके मंजुळ
इतके मी गातो की
विसरुन मलाही मीच
गाणेच बनुन जातो ...
केव्हातरी पहाटे ,
मी आत आत जातो ...

टिमटिमणारा एक प्रकाश,
मज दिसू लागतो लांबून.
जवळ बोलावून मला,
आलींगण देतो थांबून ...
मग गाण्यातून,अलगद निसटूनं...
मी नुसता प्रकाश बनून जातो .....
केव्हातरी पहाटे ,
मी आत आत जातो ...

गाणे-प्रकाश आणि मी
भेद मला न कळतो...
छे! मी म्हणताच त्या क्षणाला ,
प्रकाश अंधारून जातो ....

होऊ दे असेही केव्हा
जेव्हा प्रकाश बनुनच राहील....
बाहेरच्या निशेला ,
झटक्यात मी खाईल....
या चैतन्यमय दिवसाची,
नुसतीच वाट पाहतो....

केव्हातरी पहाटे ,
मी आत आत जातो ...
आत जात असता,
हलकेच गात राहतो.


       
           -   मयुर  ढोबळे
   https://www.facebook.com/Mazi-kavita-1505223896380307/