घाबरू नको शेतक-या

Started by निखिल जाधव, March 03, 2016, 05:19:25 PM

Previous topic - Next topic

निखिल जाधव

घाबरू नको कर्जाला
भय, चिंता फासावर टांग
जिव एवढा स्वस्त नाही
सावकाराला ठणकाऊण सांग
.
.
काळ्या आईचा लेक कधी
संकटापुढे झुकला का ?
कितीही तापला सुर्य तरी
समुद्र कधी सुकला का ?
.
.
निर्धाराच्या वाटेवर
टाक निर्भीडपणे पाय
तु फक्त विश्वास ठेव
पुन्हा सुगी देईल धरणी माय
.
.
निर्धाराने जिंकु आपण
पुन्हा यशाचा गड..


स्वलिखित :- निखिल जाधव (7304090477)


मिलिंद कुंभारे

कितीही तापला सुर्य तरी
समुद्र कधी सुकला का ?

छान..... :) :) :)

निखिल जाधव

धन्यवाद मिलिंद कुंभारे आणि आगम दादा