वास्तव

Started by Dnyaneshwar Musale, March 03, 2016, 11:17:06 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

हाफस हाफस हाफसून
पाणी नाय आलं थाळ्यात
एक एक आना का नाय
सलत  भ्रष्टाचारांच्या गळ्यात

दिवस रात राब राब राबुन
सोन्यासारखं  पिकं पिकलं
ऐन काढणीच्या काळात
मात्र बाजारभाव रोखलं.

कधी येतो उन्हाळा तर
कधी पावसाळा जोरात
उभं पिकं झोपतं
कळ येती रे उरात.

पैका पैका साठून
जिव अडकीवतो उसाच्या रोपात
बिन साखरेचा चहा मात्र
शेतकऱ्याच्याच कपात.

शिकुन साकुन पोरं
करावं म्हटलं मोठी
तीळ तीळ तुटतो
भरवताना   पोटभर रोटी.

पिकवुन पिकवुन माल
काय येतं हातात
पोसवितो  समद्यांना
जरी शेती नसली नफ्यात.