मी शुद्धीत राहावे तरी कसे.....?

Started by SHANTI, March 06, 2016, 02:53:54 PM

Previous topic - Next topic

SHANTI


सभोवार प्रेमाचा गंध असे पसरला
वाचावे त्यातून आता तरी कसे?


प्रत्येक सर प्रेमाची उधळते असंख्य प्रीत धारा
मी कोरडे निसटावे तरी कसे ?


चुकून जरी उडाली ठिणगी प्रेमाची
जबाबदार मी च दुनिया म्हणणार नाही कसे ?


जग हे या नशेत तर्र असता
मी शुद्धीत राहावे तरी कसे.....?


दीप्ती लिमन