आठ मार्च

Started by शिवाजी सांगळे, March 07, 2016, 08:25:31 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

आठ मार्च

असो धर्म काही
रूप असो कोणते,
बदलोनी दृष्टी पाहता
ती महिलाच उरते !

माता आधी रूपाने
कधी भगिनी असे,
सहचारीणी, प्रिया
नित्य जीवनी वसे !

एकच दिवस का
तीची आठवण यावी?
जन्मा पासुनच तीला
का नाही स्मरावी?

मान सन्मान देण्या
गरज का दिवसाची?
पूज्यनीय, वंदनीय
स्त्री शक्ती ती कायमची !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९