==* महिला दिवस *==

Started by SHASHIKANT SHANDILE, March 08, 2016, 11:53:12 AM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

नाही म्हणजे माझ्या तर्फे सर्वांना या दिवसाच्या शुभेच्छा आहेच पण फ़क्त आजच्या दिवस महिलांचा आदर करून भागनार आहे का? आजच्या दिवशी समजा सनी लियोनी पुरुषांसमोर आली तर पुरुष तिचा तितकाच आदर करणार आहेत ना जितकं इतर महिलांचा करतात? जरी तिने आज कपडे कसलेही घातले असावे , पण आज पुरुष तिच्या कड़े वाईट नजरेने पाहणार नाही ना?

मला एक कळत नाही आपण इतका देखावा का करतो नेहमी?

माझी आई आई माझी बहिन बहिन मग इतर महिला कुणाची आई बहिन नाही का?

पुरुष म्हंटलँ तर काहीही करण्याची आणि कसेही वागण्याची प्रवृत्ती नव्हे, पुरुषांनी फ़क्त आजच्या दिवस महिलांचा मान करून चालणार नाही तर दर दिवशी महिलांना तिचा स्थान दिलाच पाहिजे.

बलात्कार अशिक्षित आणि दारुडा व्यक्तीच् करतो का हो, श्रीमंत, उच्च शिक्षित आणि उच्च विचारांचे व्यक्तिमत्व कधीच कुण्या महिला विषयी वाईट विचार करत नाही असेच म्हणावे का? सापडला तो चोर पण बाकी काय?
मुलाने कुकर्म करावे आणि श्रीमंत बापाने पैशांच्या बळावर न्यायप्रणालिहि विकत घेऊन आपल्या मुलाला सोडवले नसेल इतका महान आपला देश नाहीच. सर्वांना माहिती आहे की आपल्या देशात महिलांची स्थिति काय आहे, मग हा सोंग, हा देखाव का व्हावा ?

माझ्या बोलण्याचे वाईट अजिबात मानु नए आणि मानलेही तरी मला फरक पडत नाही।

महिलांनी महिलापन जपावे
पुरुषांनी पुरुषपन जपावे हेच म्हणेन

एक लुगड़ं किंवा साडी घालनारी स्त्रीला भरपूर मान मिळावा आणि एक ब्रा पैंटी घालणाऱ्या बाई कड़े वाईट नजरेने बघावं हाच का मानुसपण आपला?
दोघांकडे बघण्याचा दृष्टिकोण वेगळा का असावा, हेच कळत नाही. सर्व आपल्या परीने ठीक आहेत ना, शेवटी परिधान आहे तो भारताचा आणि जर या कापडातील महिला चांगल्या नजरेने बघवत नसेल तर मग भारतात याची विक्री का व्हावी? आणि जर विक्री होत आहे तर आपण ही कापड़ं नेसणाऱ्या महिलांकडे वाईट नजरेने का बघावं?

सम्मान सर्वांचा व्हावा अन्यथा एक रामाचा आणि एक शामाचा होऊ नए....

आजची नारी क्रांतिकारी पुरुषांसोबत पाऊल टाकत समोर चालली आहे आणि आपल्या मेहनतीने आपले श्रेष्ठत्व सिद्ध करीत आहे.
फ़िल्म इंडस्ट्री मधल्या महिला चड्ड्यांवर नाचत आहेत आणि याचीच पाहणी देशभरातील मूली- महिला वागत आहे
वावगं काहीच नाही पण मा. महिलांनो एखाद्या व्यक्तिने जर तुमच्याकडे नजर वर करून बघितले तर वाईट मानु नका कारण पुरुषांची गरज महिला आणि महिलांची गरज पुरुष हा नियम आहे.
अहो हार्मोन्स लोचा आहे त्यापासून कोण वाचलय?

पुरुष शांतपणे आपल्या कामावर जाण्याकरिता बस स्टॉप वर उभा असेल आणि छोटी छोटी चिंध्याचे कपडे घालून एक मुलगी तिथे यावी आणि या माणसाने आदर पूर्वक तिला बघावं इतके महान विचार कुठल्या व्यक्तीचे असेल असं मला तरी वाटत नाही.

म्हणून प्रत्येकाने आपली एक मर्यादा बांधुन जगावे तसेच मान सम्मान आणि आदर मिळवून घेण्यासाठी मानपूर्वक वागावे हीच विनंती

परत सर्व आई बहिणींना आजच्या महिला दिना निमित्त मानाचे नमन......।

स्त्री तू जप तुझे स्त्रीत्व
वाकणार नाही पुरुषत्व
पुरुषा महिला अर्धांगिनी
जीवनाचा आधारस्तंभ
धन्यवाद!
----------------------//**--
शशिकांत शांडिले, नागपुर
भ्र.९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!