महिला दिन

Started by निखिल जाधव, March 08, 2016, 05:59:11 PM

Previous topic - Next topic

निखिल जाधव

---------- महिला दिन ------------
             
नात्यातल्या महिलांना
महिला दिनाच्या शुभेच्छा

आईच्या आईपणाला शुभेच्छा
तिच्यातल्या बाईपणाला शुभेच्छा
तिने सोसलेल्या नऊ महिन्याच्या कळांना शुभेच्छा
तिच्यात उपजत असलेल्या हत्तीच्या बळांना शुभेच्छा

बायको नावाच्या अर्धांगिनीला शुभेच्छा
तिच्यात दडलेल्या कारभारणीला शुभेच्छा
तिच्याबरोबर घालवलेल्या प्रत्येक क्षणाला शुभेच्छा
नव्या नात्यांत विरघळाऱ्या तिच्या विशेष मनाला शुभेच्छा

सख्या , चुलत , मावस , मानलेल्या बहिणीला शुभेच्छा
बहिणी सारख्या प्रिय वहिणीला शुभेच्छा
त्यांनी बांधलेल्या राखीला शुभेच्छा
आईचेच प्रेम देणाऱ्या काकीला शुभेच्छा

मावशी आणि आत्याला शुभेच्छा
त्यांनी जपलेल्या जुन्या नात्याला  शुभेच्छा

मामी आणि तिच्या मुलीला शुभेच्छा
चुकून आणि मुद्दाम केलेल्या चुकभुलीला शुभेच्छा

मेहूणीच्या खट्याळ चेष्टेला शुभेच्छा
तीने पाळलेल्या तुटक निष्ठेला शुभेच्छा

मायची माय दुधावरची साय त्या आज्जीला शुभेच्छा
पाट्यावर वाटून घाटून केलेल्या तिच्या  गावरान भाजीला शुभेच्छा

गल्ली ते दिल्ली सर्व क्षेत्रात कारभार पहाणाऱ्या रणरागिनींना शुभेच्छा
मनुष्य प्राण्याला कुटुंब देणाऱ्या या जगातील समस्त माता भगिनींना शुभेच्छा
  कवी - भालचंद्र कोळपकर



nikhilj065@gmail.com