****तुझे हासणे****

Started by श्री. प्रकाश साळवी, March 10, 2016, 11:27:17 AM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

  **** तुझे हासणे ****
तुझे हासणे शब्दाविना सांगणे
तुझे हासणे मनाशीच बोलणे
तुझे हासणे किती लोभसवाणे
तुझे हासणे चांदण्याचे चांदणे
तुझे हासणे कधि सोनचाफा
तुझे हासणे कधि ऊनाड गप्पा
तुझे हासणे ओढ लावी मनाशी
तुझे हासणे साथ हवी हवीशी
तुझे हासणे रांग ती बगळ्यांची
तुझे हासणे कमान ईंद्रधनुची
तुझे हासणे रंग ते नभीचे
तुझे हासणे गंध प्राजक्ताचे
तुझे हासणे रोज नवे बहाणे
तुझे हासणे गूढ काही सांगणे
तुझे हासणे ग्रिष्माची पानगळ
तुझे हासणे भेटीची तळमळ
तुझे हासणे वसंतातली पालवी
तुझे हासणे ओढ जिवास लावी
तुझे हासणे एक नवि पहाट
तुझे हासणे पाखरांचा किलबिलाट
तुझे हासणे तू हसत रहावे
तुझे हासणे तू जनास रीझवावे
तु अशी हसत रहावे
हास्याचे कारंजे फूलवावे

श्री.प्रकाश साळवी