प्रेम

Started by abhishek panchal, March 10, 2016, 08:15:22 PM

Previous topic - Next topic

abhishek panchal

प्रेम म्हणजे एक भावना ,
ज्याचा कधी अंत नाही

प्रेम म्हणजे सुख ,
ज्याची कुणा खंत नाही

प्रेम म्हणजे जवळ येणं ,
दूर जाण्याच्या भीतीने

प्रेम म्हणजे वेडं होणं ,
स्वतःच्या मतीने

प्रेम म्हणजे विश्वास ,
जो कधी तुटत नाही

प्रेम म्हणजे हाती हात ,
जो कधी सुटत नाही

प्रेम म्हणजे एक धागा ,
जो नाती बनवतो

प्रेम म्हणजे एक चुंबक ,
जो माणसे जमावतो