सुख-दु:ख

Started by शिवाजी सांगळे, March 10, 2016, 08:40:58 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

सुख-दु:ख

दु:ख ना दु:खांचे उरलेल्या
सारीच दु:खे भेटुन गेली,
सुखांची तर बातच न्यारी
दाखवुन वाकुल्या ती गेली !

जडली नशा तरी जगण्याची
झेलीत सुखे सारी विखुरलेली,
पेैलतीरी खुणवीती दूत सुखांचे
घेण्या भेट दुःखांची राहिलेली !

जगलो मर्जीने इथवर तुझ्या
भोगीत सुखे तूझी वाटलेली,
उरतील बेवारस तूझी दुःखे
कवटाळून कधी मी सोडलेली !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९