इवल्या त्या डोळ्यांमध्ये

Started by abhishek panchal, March 11, 2016, 08:22:10 AM

Previous topic - Next topic

abhishek panchal

इवल्या इवल्या डोळ्यांना , आस किती मोठी आहे
निडर होऊन लढते वेडे , काळ त्याच्या पाठी आहे

वादळाची फिकीर मनी , थोडीसुद्धा उरली नाही
स्वप्न अधुरे राही , अशी रात कधी सरली नाही

जिद्द तरी येते कशी , विचार करी दाही दिशा
शंका करती फितूर सारे , केली याने दारू नशा

पहाडही ते धस्की घेऊन , जागेवरती टिकून राहते
अंगावरती बागडताना , लाटही त्याला दुरून पहाते

दिली जरी हि कठोर शिक्षा , जमीन कशी याचा पायाखाली
त्रास देऊन तऱ्हेतऱ्हेचा , नियातीही मग बेजार झाली

उरले सुरले बळ लावूनि , सारे येती अंगावरती
प्रहार करता पूर्ण शक्तीने , नाईलाजाने मागे फिरती

गूढ जणू ते लपून बसले , हरेकाच्या कोड्यांमध्ये
आसमंतही शांत निजले , इवल्याश्या त्या डोळ्यांमध्ये

                                                - अभिषेक पांचाळ