येशील तू पाठून

Started by abhishek panchal, March 11, 2016, 10:38:41 PM

Previous topic - Next topic

abhishek panchal

अगदी हृदयाजवळ नको , साधा कोपराही चालेल
साऱ्या आठवणींचा दुवा , अगदी सहज जिथे मावेल
अशी एक छोटी जागा , तू राखून ठेव आता
हा दुवा ठेव तिथे , असं दूर जाता जाता

तुझी नजर तिथे आहे , समोर पुढे नवं जग
दूर जाता जाता , एकदा मागे वळून बघ
आतुरलेल्या डोळ्यांनी , उभं असेल कुणी
एक त्यांची आठवण , राहो तुझ्या ध्यानी

दिवस पण फितूर , बघता बघता सरले
आठवणींचे तारे , आकाशातच विरले
ढगांसारख्या आता , आठवणीच येतील दाटून
आस वेडी जीवा , येशील तू पाठून

                               - अभिषेक पांचाळ