मुद्दा

Started by गणेश म. तायडे, March 12, 2016, 10:06:59 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

चला बोलू काही वेगळे
तुम्हा आम्हांस पटणारे
निरंतर सोबत बसून
वेळेचे भान न राहणारे
नको नुसता गोंधळ
राजकारण्यां सारखा
हवा काही विषय
मनाला हलवून सोडणारा
संगती हवी हवीसी वाटावी
नको मुद्दा त्यात भांडणारा
पक्षपात नको पक्षासाठी
व्हावे संभाषण देशासाठी
चित्त शांत व्हावे शेवटी
ऐकून मुद्दा अंती निघणारा
पत्रकारीता सहज व्हावी
देशाला TRP न समजणारी
राजकारण्यांना पण कळावी
देशाने दिलेली जबाबदारी
नको नुसताच गोंधळ
एकमेकांची जिरवणारी
चला बोलू काही वेगळे
तुम्हा आम्हांस पटणारे
निरंतर सोबत बसून
वेळेचे भान न राहणारे

- गणेश म. तायडे
   खामगांव
   ganesh.tayade1111@gmail.com