चांदणे

Started by swaraj, March 12, 2016, 01:11:13 PM

Previous topic - Next topic

swaraj

चांदणे

पडे शुक्राचे चांदणे
डोळ्यात विरह अन्दणे

लपून बसला चंद्र राज
ह्रदयात मिलन आस

झाले माझे मन अधीर
आपल्या मिलनास सुखर

आलास राजस हळुवार
नयनास नयन झाले फार

ओल्या थंडगार रात्री
बसुनी शीतल जळी

मज  लगड प्रीया तू
प्रेमे केश कुरवाळी

प्रतीबिंब  आपले एक रंग
शांत  पाण्यास उठले तरंग

अनेका नेक पुष्प सुगंध
मोहरले मन प्रेम धुंद

चांदण्यांची सेज चमचमती
गुंतले हृदय राजसा तुझ्याती
Swati Gaidhani (swaraj )