वादळात माझी नाव आहे

Started by SHANTI, March 13, 2016, 10:57:54 AM

Previous topic - Next topic

SHANTI


हृदयाच्या खोल खोल गाभार्यात एक कप्पा आहे
तिथे तुझ्या आठवणींची वर्दळ आहे


दिसायला जरी शांत हा समुद्र
आत कुठे तरी भावनांचा सुनामी आहे


उसळुनी येतात लाटा गत क्षणांच्या अशा पण.....


किनार्यावर शांत पणे त्या कडे पाहणारा
जणू मी कोणी परका आहे 


एकरूप हि होता यायचे नाही आठवान सोबत त्या
गाव माझे वेगळे आणि वादळात माझी नाव आहे

dipti liman