आयुष्याची ओळख

Started by swapnilt310, March 13, 2016, 07:41:07 PM

Previous topic - Next topic

swapnilt310

आयुष्य हे असच असत, तुझच नाही सगळ्यांचच असत
जस बघावं तसच दिसत, आपल्याच नजरेतून घडत असत

मनात बऱ्याच इच्छा असतात, काही अधुऱ्या काही पूर्ण होतात
त्यासंगेच आपण जगायचं असत, त्या पूर्ण कराया झगडायच असत
नाही जमलं म्हणून थकायच नसत, पुन्हा नव्याने बहरायच असत
कारण आयुष्य हे असच असत, तुझच नाही सगळ्यांचच असत

इथे एखादा प्रश्न असतो, उत्तरे त्याची बरीच असतात
फक्त बरोबर ते निवडायचं असत, त्यातच खर कर्तब असत
वाढलेल्या ताटात तर, एक कुत्रं पण जेवू शकत
आयुष्य हे असच असत, तुझच नाही सगळ्यांचच असत

खूप काही करायचं असत, सगळंच मनासारखं होत नसत
पण तो एक पडाव असतो, आयुष्य थोडीच तिकडे संपत
पुढे बराच पल्ला असतो,  आपण चालत रहायचं असत
कारण आयुष्य हे असच असत, तुझच नाही सगळ्यांचच असत

घडी घडीने उलगडायच असत, इंचा इंचाने चढायचं असत
सुख दुःखाच हे चक्र असत, निरंतर ते फिरतच असत
अंधाऱ्या त्या रात्रीनंतर, राविकिरणांच स्वागत करायचं असत
कारण आयुष्य हे असच असत, तुझच नाही सगळ्यांचच असत


Vedanti

[url="http://vedantiagale.blogspot.com/"]Vedanti Agale Blogspot[/url]