प्रतिबिंब

Started by गणेश म. तायडे, March 14, 2016, 12:04:50 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

प्रतिबिंब पाण्यातले
डोळ्यांत तिच्या पाहताना
कसे आवरू मनाला
रूबाब चढला सौंदर्याला
काठावरती बसून नदीच्या
पाण्यात तिला निहारताना
वाहावे नदीत पाणी बनून
स्पर्श करावा तिला लपून
घ्यावे तिने ओंजळीत भरून
शिपळावे हळूच चेहऱ्यावरी
मनात गिरक्या प्रित घेई
ओघळताना तिच्या गालांवरी
रोज तिने यावे मला छळावे
येता-जाता प्रितीचे झरे वाहावे

- गणेश म. तायडे
    खामगांव