हा ध्यास तुझा 2

Started by swapnilt310, March 14, 2016, 12:21:06 AM

Previous topic - Next topic

swapnilt310

आयुष्यतला एक अधुरा अध्याय, प्रेमाचे न उलगडलेलं पान
मनात असतो तो एक चेहरा,  नकळत लावतो प्रेमाच ध्यान
कोण कुठला कुठल्या गावचा, माझ्याआसाठी नवखा असतो
अनोळखी परका तो चेहरा, नेहमीच मात्र आपलासा भासतो

रेशमी केसांच्या संध्येमध्ये, माझे मन बहरून जाते
निरागस ते सुंदर नेत्र, जिवनात माझ्या एक तेज भरते
कोण कुठली हे माहीत नसता, एक वेगळीच ओढ लावतो
अनोळखी परका तो चेहरा, नेहमीच मात्र आपलासा भासतो

असेल कुणीतरी माझ्याहीसाठी नेहमीच ही आस असते
अस्पर्शित मखमली कांती, उगाच मलाही जाणवू लागते
कधी एकट एकट भासता, मला जवळ करून जातो
अनोळखी परका तो चेहरा, नेहमीच मात्र आपलासा भासतो