मला लागलाय तुझा लळा...

Started by Ravi Padekar, March 14, 2016, 04:21:49 PM

Previous topic - Next topic

Ravi Padekar

                             मला लागलाय तुझा लळा...

हात ना सुटे हातातुंनी
पाऊले ना वळती मागे
गुंत्यात गुंता अडकुनी
तुटले प्रेमाचे धागे

ओसाड पडला प्रीतीचा
बहरलेला मळा
छंद जडला अंतरंगि
मला लागलाय तुझा लळा...

शोधणार्‍या नजरेला 
होतो तुझाच भास
उधाण या मनाला
लागते तुझीच आस 

रूप तुझे, मन सोज्वळ
धडपडे पाहण्यास एकवेळा
छंद जडला अंतरंगि
मला लागलाय तुझा लळा...

मन ना कुठे,
ध्यान ना कुठे,
घेरल विचारांनी मला
पहिल्याच भेटीत पडलो प्रेमात
पहिलं जेव्हा मी तुला

तुझ्या प्रेमाच्या बंधनात
जीव झालाय उतावळा
छंद जडला अंतरंगि
मला लागलाय तुझा लळा...

कवि:- रवि पाडेकर (मुंबई)
मो.- 8454843034