एक प्रेम अस ही..........!!!

Started by Ravi Padekar, March 14, 2016, 04:33:08 PM

Previous topic - Next topic

Ravi Padekar

खूप दिवस झाले तुझी माझी गाठ नाही
अन तुझ्या कडे येण्याची मला माहीत वाट नाही
मी निजलेली असताना तुझी येण्याची वेळ ठरते
सकाळ होताच तुझ्याविणा दिवस असेच सरते
आणशील ना बाबा माझ्यासाठी वॉटर-बॅग नि डबा
आज तरी लवकर घरी येशील ना रे बाबा

आईदेखील नसते घरी,
खेळण्यास माझ्यासवे
जाते घर माझ्यावर सोपावून,
येते एकांत मला अडवे

एकटे बसून येतो,
मला कंटाळा या जागेत,
तू लवकर आल्यावर,
जाऊ खेळायला बागेत
झोके घेऊ झाडाच्या हातात पकडून पारंब्या
आज तरी लवकर घरी येशील ना रे बाबा

आज तरी हे नयन झोपणार नाही लवकर
तुझ्या येण्याच्या ओढीने नजर ठेवतील दारावर
ऐकायची आहे तुझ्याकडून मला गोष्ट "सात अजूबा"
आज तरी लवकर घरी येशील ना रे बाबा

तुझ्या वाट पाहण्याने रात्र अशी जाते सरून
तुला शोधण्यास मन जाते घरभर फिरून,
शेवटी डोळ्यातले आसवे पुसत,
नजर जाते तुझ्या हार घातलेल्या फोटो कडे वळून
कायमचाच गेला बाबा आम्हाला एकटे सोडून...!!!

कवि:- रवि पाडेकर (मुंबई )
मो.-8454843034

snehal jadhav