माझ पहिलं प्रेम...!!!

Started by Ravi Padekar, March 14, 2016, 04:45:30 PM

Previous topic - Next topic

Ravi Padekar

नाजुकश्या कळ्यामधून, बहरलेल फूल तू
माझ्याच  खर्‍या प्रेमाला, झाली होती कबूल तू
जपली आहे अजूनही, भेट दिलेली FRAME तू
कारण तू होत माझ, पहिलं वहिल प्रेम तू...

पाहिले पहिल्यांदा तुला, भिडली नजरेला पार तू
वाजली गिटार मनात, छेडिली काळजाची तार तू
तेव्हाच मनात ठरले फक्त माझ एक DREAM तू
कारण तू होत माझ, पहिलं वहिल प्रेम तू...

टप टपणार्‍या थेंबांनी, पावसाची बरसात तू
मला भिजत पाहताना, उभी अशी दारात तू
मनामध्ये केले होते आठवणीचं HOME तू
कारण तू होत माझ, पहिलं वहिल प्रेम तू ..

वार्‍यासोबत आलेली गारव्याची चाहूल तू
वार्‍याची झुळूक येताच शिरायची अलगद मिठीत तू
शहारले होते अंगावर स्पर्शाने रोम रोम तू 
कारण तू होत माझ, पहिलं वहिल प्रेम तू

कवि:- रवि सुदाम पाडेकर. (मुंबई)
मो.- 8454843034