नयन माझे थकले...!!!

Started by Ravi Padekar, March 14, 2016, 05:00:35 PM

Previous topic - Next topic

Ravi Padekar

वाट पाहुनी पाहुनी ग तुझी
नयन माझे थकले
दोन दिलां मधले आता
अंतर हे वाढले

मन झुरते फिरते
तुला एक वेळ पाहण्यास
शब्द पुटपुटे मनाशी
तुझ्याशी एकदा बोलण्यास

या सुंदर कमळा पायी
हात चिखलानी माखले
दोन दिलां मधले आता
अंतर हे वाढले

मन लागे ना कुठे
समोर तुझा तो चेहरा
जीव अडकला तुझ्यात
उरला एकांतात मला किनारा

प्रेमाच्या फांद्यांना
घाव शब्दाचे पडिले
दोन दिलां मधले आता
अंतर हे वाढले
वाट पाहुनी पाहुनी ग तुझी
नयन माझे थकले

कवि:- रवी पाडेकर. (मुंबई )
मो.- 8454843034