कुणाच्या तरी चुकून एकदा प्रेमामध्ये पडायचं

Started by Ravi Padekar, March 14, 2016, 05:14:46 PM

Previous topic - Next topic

Ravi Padekar

लोक करतात म्हणून आपण ही करायचं
कुणाच्या तरी चुकून एकदा प्रेमामध्ये पडायचं

चेहरा मनात ठेऊन रातभर जागायचं
तहान भूक विसरून तासन -तास बोलायचं
कधी थोड भांडायचं तर कधी थोड रूसायचं
रूसलेल्या चेहर्‍याला देखील कधी खुद्कन हसवायचं

लोक करतात म्हणून आपण ही करायचं
कुणाच्या तरी चुकून एकदा प्रेमामध्ये पडायचं

हातात हात धरून किनार्‍यावर चालायचं
किती दूर चाललो हे पुन्हा मागे वळून पाहायचं
कधी एकदा भेटायचं तर कधी थेटर गाठायचं
सिनेमातल्या हीरो वानी कधी लैला मजनू बनायचं

लोक करतात म्हणून आपण ही करायचं
कुणाच्या तरी चुकून एकदा प्रेमामध्ये पडायचं

दोन छत्री असताना एकाच छत्रीत चालायचं
छत्रीवरच्या पाण्याने एकमेकांना थेंबांनी भिजवायचं
कधी खूप बोलायचं तर कधी शांत बसायचं
मनातले ते बोल तिने नजरेतूनच ओळखायचं

लोक करतात म्हणून आपण ही करायचं
कुणाच्या तरी चुकून एकदा प्रेमामध्ये पडायचं

चांदण्याच्या प्रकाशामध्ये पावलो- पाऊल चालायचं
आयुष्याचं प्रत्येक पान आनंदाने पलटायचं
कधी थोड सिम्पल तर कधी वेगळेपण आणायचं
तिच्यासाठी आपण देखील राजकुमार बनायचं

लोक करतात म्हणून आपण ही करायचं
कुणाच्या तरी चुकून एकदा प्रेमामध्ये पडायचं

कवि:- रवि सुदाम पाडेकर (मुंबई)
मो.- 8454843034